प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर 


पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा – भाऊसाहेब भोईर 

पिंपरीपुणे (दि.०९ फेब्रुवारी २०२६पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत प्रशासन काळात झालेल्या मोठ्या प्रकल्पांचीप्राधान्याने चौकशी करावी५० हजार नागरिकांच्या हरकती येत असतील तर डीपी रद्द करावारस्ते लहान करणारा हरित सेतूप्रकल्प रद्द कराप्रशासनाने अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठीपाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी काय केले याचीमाहिती द्या.

या मागण्यांसह महापौर रवी लांडगे यांनी पाणी पुरवठा २४ तास सुरू करू असे सांगितले आहेत्यांच्या मताशी मी सहमतआहेमी विरोधी पक्षनेता असलो तरी विरोधाला विरोध करणार नाहीतर सत्ताधारी आणि विरोधकनागरिक यांच्यामध्येसमन्वयक म्हणून काम करणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीसांगितले.

  सोमवारीमनपा कार्यालयात भोईर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.   यावेळी भोईर म्हणाले कीआम्ही राज्य सरकार मध्ये महायुतीत सत्तेत आहोतपरंतु येथे विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांशीसमन्वय साधून शहर विकासासाठी काम करणार आहेकाही अधिकारी निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेऊनअटीशर्ती ठरवतातअनेक अधिकारी तर मनपाचे मालक झालो आहोत अशा आविर्भावात आहेत.

 शहरात अनेक भागातअजूनही टँकर ने पाणी घ्यावे लागते याला जबाबदार कोण ? अनेक निविदा वाढवून तिजोरीची लूट सुरू आहेकालांतरानेकामगारांच्या पगारासाठी राज्य सरकार वर अवलंबून रहावे लागेलमनपाची आर्थिक घडी पुन्हा बसवावी लागेलप्रशासनकाळात झालेल्या सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी करण्यात येईलहॉकर झोनचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावालागेलतलाठीसर्कल ऑफिसतहसीलदार ऑफिसपोलिस स्टेशनपोलिस आयुक्तालय अशा या शहराच्या हद्दीतअसणाऱ्या सर्व शासकीयनिमशासकीयकेंद्र सरकारच्या कार्यालयांवर मनपा चा अंकुश पाहिजेयाठिकाणी नागरिकांचीकामे वेळेत झाली पाहिजेत
कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजेनदी सुधार योजनेच्या ऐवजी नद्यांची गटारं झालीआहेतपर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहेराज्यकर्त्यांनी भानावर येण्याची गरज आहेआताचुकीच्या कामावर लक्ष ठेऊन सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरयांनी दिली.

  • प्रशासनकाळात झालेल्या बेकायदा कामांची चौकशी व संरचना सुधारणा: सर्व शासकीय व उपशासकीय कार्यालयांवर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा नियंत्रण आवश्यक असून, जनतेच्या कामांच्या वेळी कामे पूर्ण व्हावीत व कायदा सुव्यवस्थित राहावा, त्यासाठी भ्रष्टाचारविरोधी व पर्यावरणीय उपाय आवश्यक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *