महापौर रवि लांडगे यांनी केली निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी…
पिंपरी, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – पिंपरी चिंचवड शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठायंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापौर रवि लांडगे यांनी आज निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरणकेंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेच्या वतीनेसध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या व प्रस्तावितउपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफकेमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरीदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकयांच्यासह पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी घेण्यात येते. हे पाणी चिखलीयेथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. याशिवाय भविष्यातील वाढतीपाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरणप्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. तसेचनिगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातवापरण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
यानंतर निगडी येथील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. यावेळी संगणकीयसादरीकरणाद्वारे त्यांनी केंद्राबाबत सविस्तर आढावा घेतला. हे जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेनेकार्यान्वित करण्यात आले होते. मात्र शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीतझालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. सध्या हे केंद्र ५५० एमएलडीक्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमहानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्तातपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहितीही यावेळी महापौर यांना देण्यात आली.
या पाहणीदरम्यान भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाचीसाखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता वस्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली.
यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठाहोण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आणि त्यासाठी अधिकाधिक दर्जेदारउपाययोजना राबविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.







Leave a Reply